Articles
->  

पुणे - ""माणसाचे मन जाणून घेण्यासाठी माणूस व्हायला हवे. सध्याच्या परिस्थितीत चारित्र्यवान माणसांची उणीव भासते. आजची मुले उद्याचे भविष्य असून, त्यांना चारित्र्यवान घडविण्यासाठी पालक-शिक्षकांनी सदैव प्रयत्न करावेत,'' असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी रविवारी केले. 

चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा "राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार' सत्यनारायण यांना मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता, पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, उपाध्यक्ष रमेश वाघ, श्रीधर गायकवाड उपस्थित होते. प्रतिष्ठानतर्फे पाचवी ते दहावीतील 24 विद्यार्थ्यांना "चारित्र्य उपासक छात्र पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. 

सत्यनारायण म्हणाल्या, ""या मुलांचे विचार ...

मुंबई-पुण्यासारखा छोटासा रेल्वेप्रवास असतो. गाडीत एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या शेजारी लष्करातील एक सुभेदार बसलेला असतो. गाडी सुटते तसा तो इंजिनिअर लॅपटॉप उघडतो. काम करताना तो स्वतःशीच बोलत असतो, ""प्रवास असो नाही तर घर असो, मला माझं काम अखंड चालू ठेवावंच लागतं.'' सुभेदार ते ऐकत लॅपटॉपकडे बघत म्हणतो, ""सर, तुम्ही म्हणजे किमयाच करता की हो! एवढ्याशा या डब्यातून काय काय गोष्टी काढता आणि जगाला तंत्रज्ञानाच्या मार्गावर पुढे नेता.'' ते ऐकून इंजिनिअरला रागच येतो. "या माणसाला काय समजणार माझ्या कामाबद्दल?' असं मनात म्हणून तो सुभेदाराकडे दुर्लक्ष करतो. सुभेदार पुन्हा चिकाटीने म्हणतो, ""साहेब, कसं काय जमतं हो तुम्हाला हे सगळं? तुम्ही काहीही म्हणा; पण तुमच्यासारख्या इंजिनिअरबद्दल फार अभिमान वाटतो हो.'' हे गौरवोद्‌गार ऐकून इंजिनिअर थोडा विरघळतो आणि म्हणतो, ""तुम्हाला काय कल्पना आहे? बुद्धीशी संलग्न अ...

एका प्राणी संग्रहालयाचा प्रमुख रक्षक प्राणी संग्रहालयाच्या हद्दीतच राहत असे.  काही आपत्ती आल्यास रक्षकाने जवळच असावे या हेतूने प्राणी संग्रहालयातर्फे त्याला तिथेच निवासस्थान दिले होते.  हा माणूस अत्यंत कष्टाळू होता.  प्राण्यांवर निरातिशय प्रेम करायचा.  प्रत्येक प्राण्यांची त्याला इथ्थंभूत माहिती होती.  प्रत्येक प्राण्यांच्या आवडी निवडी त्याला ठावूक होत्या.  एवढेच काय, त्या प्राण्यांशी तो एवढा एकरूप झाला होता की त्यांच्या मनात काय चालले आहे हेही त्याला समजायचे.  थोडक्यात काय, तर हा रक्षक प्राण्यांच्या त्या जगात पूर्णपणे भिनला होता.  बाहेरच्या जगाला तो विसरून गेला होता.
घरात त्याची नवीन लग्न होऊन आलेली तरुण पत्नी होती.  कित्येकदा हा दुपारचा जेवायलाही घरी यायचा नाही आणि संध्याकाळीही अनेकदा निरोप पाठवून “येतो, येतो” म्हणत या माणसाला घरी पोहो...

“दुकानदाराच्या मारहाणीत आमदार पुत्राचा मृत्यू” अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि टीव्ही वरही पाहिली.  नॉर्थ-ईस्ट मधल्या एका राज्यातून विशीतला एक मुलगा दिल्लीत येतो.  एका दुकानात काहीतरी खरेदी करण्यासाठी जातो.  त्याची केशरचना जरा वेगळी असते.  त्यावरुन दुकानदार त्याची टिंगल करतो आणि टिंगल करीतच राहतो.  आजूबाजूचे लोकही त्यात सामील होतात.  शेवटी मुलाला ती टिंगल सहन न होऊन तो खाली पडलेला एक दगड उचलतो आणि दुकानावर भिरकावतो.  दुकानाची काच तडकते.  तेवढयाने दुकानदाराचा पारा चढतो आणि तो आजूबाजूच्या दुकानदारांना बोलावून या मुलाला एवढा तुडवतो की त्या मुलाला त्याच प्राण गमवावे लागतात.
वर्णद्वेषावरून, दिसण्यावरून, रंगावरून जगभरात सातत्याने हत्या होत असतात.  भारतातही अश्या प्रकारच्या Hate Crimes म्हणजेच तिरस्कारातून निर्माण झालेले गुन्हे, सातत्याने आपल...

आता जी कथा मी सांगणार आहे, ती अनेक लोकांनी, अनेक नावांनी यापूर्वी लिहिली आणि सांगितली आहे. कथा तशी साधीच आहे; पण त्याचा आशय फार गहन आहे. पुष्कळ पाणवठे असलेल्या एका गावात एक माणूस मासेमारी करून आपली उपजीविका करीत असतो. पोटापुरते मिळवायचे आणि आनंदात राहायचे, एवढीच त्याची आयुष्याकडून अपेक्षा असते. सकाळी न्याहारी करून तो मासे पकडायला जायचा. गाणी म्हणत म्हणत निवांतपणे मासे पकडत बसायचा. पकडलेले मासे विकून आलेली मिळकत घेऊन तो घरी जायचा व बायको-मुलांसह आनंदात राहायचा. 


एक दिवस काय झाले, काही परदेशी पाहुणे त्या गावात आले. पाणवठ्याचा अभ्यास करणारी ती मंडळी होती. फिरत फिरत ते त्या पाणवठ्याजवळ आले, जिथे हा माणूस मासे पकडून निवांत पडला होता. परदेशी मंडळींनी त्याची विचारपूस केली. त्याची जीवनशैली ऐकून सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यातील एक जण या माणसाला म्हणाला, ""तू जाळे टाकून मासे ...

"हात देता आधाराला 
त्याने आकाश पेलले 
अन्‌ छत आकाशाचे 
वर झुलूही लागले' 
आधाराचा एक हात माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो. श्रीकृष्णाने तर एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि गोकुळवासीयांचे रक्षण केले. प्रत्येक माणसाला असा एक भक्कम आधार हवा असतो. काहींना आर्थिक आधार हवा असतो, तर काहींना भावनिक. कोणाला आध्यात्मिक आधाराची आस असते. 

रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर कथा आहे. एकदा एक राजा आपली प्रजा सुखात आहे की नाही हे पाहण्यासाठी राजवाड्याबाहेर पडतो. सुंदर सोनेरी रथात स्वार होऊन तो नगरातून फेरी मारू लागतो. राजाच्या या फेरीची खबर दवंडीद्वारा राज्यभरात पोचविलेली असते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा राजाला पाहण्यासाठी गर्दी जमलेली असते. प्रजा उत्सुकतेने माना उंचावून, पायांच्या टाचा उंचावून राजाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक ...